पुणे : गाव तमाशात मग्न अन् शाळेचे कंपाउंड भग्न | पुढारी

पुणे : गाव तमाशात मग्न अन् शाळेचे कंपाउंड भग्न

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : ­­यात्रेनिमित्त आयोजित तमाशा पाहायला गाव मग्न झालेले होते. तर दुसरीकडे शाळेची संरक्षक भिंत जेसीबीने उखडून टाकत वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी आणलेले चार लाख रुपयांचे साहित्य लंपास केल्‍याचा प्रकार समोर आला. हा खळबळजनक प्रकार गुळाणी (ता. खेड) येथे घडला. या प्रकरणी गुळाणीच्या सरपंच इंदूबाई ढेरंगे, उपसरपंच अनिता शिनगारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप पिंगळे व मुख्याध्यापिका सुनीता गावडे यांनी आज (शनिवार) खेड पोलिस स्‍टेशन मध्ये तक्रार नोंदवली.

पुणे : बिबट्याने साडेतीन वर्षाच्या चिमुकल्‍याची मान पकडली; मुलगा गंभीर जखमी

तीर्थक्षेत्र गुळाणी येथे श्री सटवाजीबाबा महाराजांच्या यात्रेनिमित्त शुक्रवार (दि. १) रात्री तमाशाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सगळे गाव तमाशात मग्न असल्याचा डाव साधून तीन वर्षांपूर्वी बांधलेली संरक्षक भिंत पाडण्यात आली. तसेच, येथे वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी आणलेले स्टील (लोखंडी सळया), सिमेंट असे जवळपास चार लाखांचे साहित्य चोरी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

बारामती : मोराळवाडीत तरुणाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, तिघांवर गुन्हा दाखल

दरम्यान, येथे झालेल्या शाळेच्या संरक्षक भिंतीवरून लगतच्या मिळकतदार व ग्रामस्थांमध्ये वाद होता. अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी होत्या. कायदेशीर मार्गाने हा तिढा सोडविण्यासाठी प्रयत्नसुद्धा झाले होते. मात्र, त्यात अपयश आले, असे समजते. या प्रकाराने मात्र गावात आणखी मतभेद, वाद निर्माण होण्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. शाळेच्या नुकसानीबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button