पुणे : ‘व्हीसी’मुळे झाली माय-लेकरांची भेट | पुढारी

पुणे : ‘व्हीसी’मुळे झाली माय-लेकरांची भेट

शंकर कवडे

पुणे : मुलांपासून विभक्त राहणार्‍या, तसेच मुलांचा ताबा नसलेल्या पालकांसाठी व्हिडीओ कॉलचा पर्याय कोरोनाकाळात दिलासा देणारा ठरला आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ते आतापर्यंत 778 पालकांची आपल्या मुलांशी ऑनलाइन भेट झाली. न्यायालयीन कामकाजादरम्यान संपर्कात येऊन कोरोना टाळण्यासाठी उच्च न्यायालयाने सुचविलेला व्हिडीओ कॉलिंगचा मार्ग पालकांसाठी सुखद अनुभव देणारा ठरतो आहे. घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आई अथवा वडिलांकडे मुलांचा ताबा असतो. या काळात मुलांना भेटता यावे, यासाठी पती किंवा पत्नीकडून न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येतो.

हिजाब समर्थकांचा बेळगावात गोंधळ, ६ युवक ताब्यात

न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर पालकांना ठरलेल्या वेळेत आपल्या मुलांना कौटुंबिक न्यायालयातील चाईल्ड केअर सेंटरमध्ये प्रत्यक्ष भेटता येते. या वेळी पालकांना मुलांशी गप्पा मारता येतात. कोरोनाच्या शिरकावानंतर न्यायालयीन कामकाजावर परिणाम होऊन चाईल्ड केअर सेंटरही बंद ठेवण्यात आले. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांना भेटण्यात अनेक अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून कौटुंबिक न्यायालयाने आई-वडिलांना आपल्या मुलांना भेटता यावे, यासाठी व्हिडीओ कॉलद्वारे भेटण्याची परवानगी दिली. त्याचा पुरेपूर फायदा घेत पालकांनी आपल्या चिमुकल्यांशी संवाद साधल्याची माहिती दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे
यांनी दिली.

Ahmedabad serial bomb blast case : मोठा निकाल! अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी ३८ दोषींना फाशीची शिक्षा, ११ दोषींना मरेपर्यंत जन्मठेप

मुलाला आई-वडील या दोघांचेही प्रेम मिळणे आवश्यक असून, मुलाचा तो अधिकारही आहे. मात्र, कोरोनामुळे न्यायालयीन कामकाज थांबल्याने ते शक्य नव्हते. त्या पार्श्वभूमीवर कौटुंबिक न्यायालयाने व्हीसीद्वारे मुलांना भेटण्यास परवानगी दिली. परिणामी बहुतांश पालकांना आपल्या मुलांना प्रत्यक्ष नसले, तरी व्हीसीद्वारे पाहता आले; तसेच त्यांच्याबरोबर गप्पा मारता आल्या.
-अ‍ॅड. प्रथमेश भोईटे

हेही वाचा

उत्तर प्रदेशात हजारो मतदारांची नावे गायब; मुस्लिम-दलित मते घटवल्याचा भाजपवर आरोप

गायिका वैशाली भसने : माझ्या जिवाला धोका, हत्येचा कट रचला जातोय

अजिंक्य फॉर्मात; रणजी स्पर्धेत झळकावले शतक

Back to top button