

पुढारी ऑनलाईन
लोकप्रिय, प्रसिध्द गायिका वैशाली भैसने हिच्या जीवाला धोका आहे. तिने आपल्या जीवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचत जात असल्याची पोस्ट लिहिलीय. तिने स्वत:तिच्या फेसबूक अकाऊंटवरूवन ही पोस्ट लिहिलीय. पण, गायिका वैशाली भसने हिने ही अचानक पोस्ट केल्याने, सर्वांनाच प्रश्न पडलाय.
काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जातोय. 2 दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे.आज मला तुमच्या support ची गरज आहे.
तिने सर्वांना मला पाठिंबा हवाय, असेही पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टनंतर तिला खूप सारे कमेंट्स येत आगहेत. तिचे फॅन्स आणि नेटकऱ्यांनी तिला पाठिंबा दिलाय.
ताई आम्ही सोबत आहोत, काळजी घ्या. तक्रार नोंदवा. तक्रार घेत नसतील तर cmo, पोलीस, गृहमंत्री यांना इमेल करा., ताई तुमच्या जीवाला धोका आहे अश्या धमक्या येतात तर तुम्ही जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा आणि जो कोणी आहे त्याच्या नावासकट करा. सर्व पुरावे सादर करा,कॉल रेकॉर्ड, मेसेजेस अस काही असेल ते सर्व द्या. पोलिस तुम्हाला संरक्षण देतील आणि त्या आरोपीला अटक करतील. तुम्ही घाबरून जाऊ नका,आम्ही तुमच्या सोबत आहोत, काळजी नको पण सावधगीरी घे तक्रार नोंदव आम्ही तुझ्यासोबत आहोत. जयभीम जय शिवराय, ताई तू खुप धाडसी आहेस, तुझा प्रवास पाहिला आहे, घाबरु नकोस, संशय असेल तर लगेच fir कर, काळजी घे, आम्ही सगळे लांब आहोत, तरीपण आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत. अशा कमेंट्स तिच्या या पोस्टला येत आहेत. तिने ही पोस्ट १ तासांपूर्वी फेसबूकवर टाकली आहे.
वैशालीनं दोन दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टींचा खुलासा करणार असल्याचं सांगितलंय. ती गौप्यस्फोट करणार असल्याचे पोस्टमध्ये म्हटलं आहे. आता ती काय गौप्यस्फोट करणार आणि तिने ही पोस्ट का टाकलीय, हे आता तिच्याकडूनच कळणार आहे.