पुणे : अश्लील चाळे करत भोंदूबाबाने लुटले ५० लाख ३० हजार | पुढारी

पुणे : अश्लील चाळे करत भोंदूबाबाने लुटले ५० लाख ३० हजार

पुणे, पुढारी वृत्तसेवा :   करणी झाल्याचे सांगून अघोरी प्रकार करत, अश्लील चाळे करून एका भोंदू बाबाने तब्बल ५० लाख ३० हजार रुपये लुटल्‍याचा धक्‍कादायक प्रकार पुण्यात घडला. याप्रकरणी भोंदू बाबासह दोघांना खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजेंद्र बलराम कन्ना (४५, रा. गंजपेठ) आणि मनिष बापूराव शिंदे (४२, रा. देहूरोड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. या प्रकरणी ३५ वर्षीय महिलेनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विनयभंग, फसवणूक, धमकावणे आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मे 2018 ते 2019 या कालावधीत भोंदूगिरी करणार्‍या राजेंद्र कन्ना याने फिर्यादीला त्यांच्या आईवर नातेवाईकांनी करणी केल्याचे सांगितले.आईवरील करणी काढण्यासाठी त्याने कागदी चिठ्ठ्या तयार केल्या. काळी बाहुली, लिंबू, हळद, कुंकु, लिक्वीउ याचा वापर करून होमहवन केले. तसेच बोकडाचा स्मशानभुमीत बळी देण्यासाठी जादूटोण्यासारखे अघोरी कृत्य करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून ५० लाख ३० हजार रूपये घेतले. त्यांची फसवणूक करून आरोपी मनिष शिंदे याने कन्ना याच्याकडून पैसे काढून देतो, असे सांगत फिर्यादीसोबत अश्लील चाळे करून विनयभंग केला. याबाबत कोणास सांगितले व तक्रार न देण्यासाठी धमकी दिली, असेही फिर्यादीत म्‍हटलं आहे.

हेही वाचलं का?  

Back to top button