धुळे : डोक्यात लोखंडी रॉड मारुन युवकाचा खून | पुढारी

धुळे : डोक्यात लोखंडी रॉड मारुन युवकाचा खून

धुळे पुढारी वृत्तसेवा : डोक्यात लोखंडी रॉड मारून तरुणाचा खून केल्याची घटना दोंडाईचा पोलीस ठाण्यात घडली आहे. यासंदर्भात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

दोंडाईचा येथील गोपाळ नगर भागात राहणारे अरुण संतोष तिर्मले यांच्याबरोबर सागर राजेंद्र तिर्मले यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादात सागर याने अरुण तिरमले यांना शिवीगाळ करत असतानाच लोखंडी रॉडने मारहाण सुरू केली. यावेळी लोखंडी रॉडचा वार अरुण याच्या डोक्यावर गंभीरपणे लागल्याने तो जागीच कोसळला. ही बाब लक्षात आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची बाब वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून जाहीर केली. या संदर्भात दोंडाईचा पोलीस ठाण्यात सागर राजेंद्र तिरमले यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा ;

Back to top button