पालघर-अमळनेर एसटी टेम्पोला धडकली, चालकासह ५ प्रवासी जखमी | पुढारी

पालघर-अमळनेर एसटी टेम्पोला धडकली, चालकासह ५ प्रवासी जखमी

मनोर (ता. पालघर) : पुढारी वृत्तसेवा : पालघर जिल्ह्यातील मनोर – विक्रमगड रस्त्यावरील केव फाट्यावर पालघरवरून अमळनेरला जाणाऱ्या एसटीला अपघात झाला आहे. गुरुवारी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात चालकासह पाच प्रवासी जखमी झाले.

पालघरवरून अमळनेरकडे जाणाऱ्या एसटीमध्ये मनोर विक्रमगड रस्त्यावर केव फाट्यावरून काही प्रवासी चढले. काही मीटर अंतर पुढे जाऊन एसटी चालकाने ब्रेक मारला. त्यावेळी निसरड्या रस्त्यावर एसटीची चाके घसरून एसटी समोरून येणाऱ्या टेम्पोला धडकली. अपघातात एसटी चालकासह पाच प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त एसटीमध्ये विक्रमगड जव्हारच्या दिशेने जाणारे तीस प्रवाशी प्रवास करीत होते. गुप्ता क्रशर मशीनमधून निघणाऱ्या वाहनांमुळे वळणावरच्या रस्त्यावर चिखल माती आल्याने रस्ता निसरडा झाल्याचे मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले.

अपघातात जखमी झालेल्यांची नावे : दयानंद (वय ५४), कैमूद्दीन शेख (वय ३१), धिरेंद्र यादव (वय ३२), राधेश्याम तिवारी (वय ३८), रवींद्र यादव (वय ४०), एसटी बस चालक तवाब खान (वय ३२).

Back to top button