कोल्हापूर : तीन महिन्यांत 267 मोबाईलचा शोध | पुढारी

कोल्हापूर : तीन महिन्यांत 267 मोबाईलचा शोध

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  चोरीस गेलेले, गडबडीत गहाळ झालेले 267 मोबाईल सायबर पोलिसांनी शोधून काढले. 2019 पासून वेगवेगळ्या ठिकाणी गहाळ झालेले 26 लाख रुपये किमतीचे मोबाईल शोधण्यात यश आले आहे. बुधवारी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या उपस्थितीत संबंधितांना बोलावून हे मोबाईल त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरीस गेलेले मोबाईल, मालकांकडून पडलेले मोबाईल तांत्रिक माहितीच्या आधारे शोधण्याचे काम सुरू होते. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. सायबर पोलिस ठाण्यातील कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील असिफ कलयगार, सुरेश पाटील यांचे वेगवेगळे पथके तयार करून गहाळ झालेल मोबाईल शोधण्यात आले. एका महिन्यात दीड लाख रुपये किमतीचे 150 मोबाईल शोधून काढण्यात आले.

ज्या मोबाईलधारकांचे मोबाईल मिळून आले आहेत अशांना बुधवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलाविण्यात आले होते. मोबाईल परत मिळाल्याने सर्वांनी समाधान व्यक्‍त केले. मागील तीन महिन्यांत 26 लाख रुपये किमतीचे 267 मोबाईल परत करण्यात कोल्हापूर सायबर पोलिसांना यश आले आहे.

Back to top button