नागपूर: पावसाने विमाने खोळंबली, प्रवाशांना फटका | पुढारी

नागपूर: पावसाने विमाने खोळंबली, प्रवाशांना फटका

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : नागपूर शहरात गुरूवारी सकाळी झालेल्या वादळी पावसाचा फटका नागपूर येथून सकाळी नाशिक आणि पुण्याकडे जाणाऱ्या विमानांना बसला. एक ते दीड तास विलंबाने दोन्ही विमाने पुढच्या प्रवासाला निघाली. दिवसभर पावसाने हजेरी लावल्याने उन्हाळा की पावसाळा असा प्रश्न नागपूरकरांना पडला. मे महिन्यात आजवर 58 वर्षात सर्वाधिक 50.02 मिमि पावसाची नोंद झाली.

गुरुवारी सकाळी ९ वाजता वादळी वारा आणि पावसाला सुरुवात झाली. अतिशय सोसाट्याचा वादळी वारा असल्याने नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नाशिक आणि पुण्यासाठी उडणारे विमाने दीड तास थांबवून ठेवावे लागले. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावरच ताटळत बसावे लागले.नागपूर नाशिक नागपूर पुणे नागपूर बंगलोर अशा अनेक विमानांना पर्यायाने पावसाचा फटका बसला. दोन दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या संतप्त कर्मचाऱ्यांनी एकाचवेळी सुटी घेत काम प्रभावित झाल्याने हवाई प्रवाशांना नाहक मनस्ताप, प्रवासाचा बेत रद्द करावा लागला.

हेही वाचा 

Back to top button