Nashik News : पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीस आजन्म कारावास | पुढारी

Nashik News : पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीस आजन्म कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीस न्यायालयाने आजीवन सश्रम कारावास व एक लाख रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. प्रकाश काशीनाश पाटोळे (३७, साईबाबानगर, सिडको) असे आरोपीचे नाव आहे. त्याने १९ फेब्रुवारी २०१३ रोजी सकाळी दहा वाजता पत्नीवर प्राणघातक हल्ला केला होता.

प्रकाश पाटोळे याने त्याची पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत वाद घातला होता. ‘मी दुसरी बायको करतो’ असे म्हणून त्याने पत्नीचे तोंड दाबून तिच्या अंगावर रॉकेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात प्रकाश पाटोळे विरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एम. एम. गावित यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. रेश्मा जाधव यांनी युक्तिवाद केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे जिल्हा न्यायाधीश मृदुला भाटिया यांनी प्रकाश पाटोळे यास शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून सहायक उपनिरीक्षक ए. कुवर, अमलदार पार्वती चौधरी यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा :

Back to top button