जळगांव : तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू! | पुढारी

जळगांव : तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू!

जळगांव; पुढारी वृत्तसेवा : पाचोरा तालुक्यातील घुसर्डी बुद्रुक या गावातील २५ वर्षीय शेतकरी तरुण ८ रविवार रोजी शेतात कामे जाण्यासाठी गेला असताना त्याला सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतात विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील घुसर्डी बुद्रुक येथील विकास धर्मा निकुंभ (वय २५) हा तरुण ८ ऑक्टोंबर रविवार रोजी सकाळी ९:०० वाजेच्या सुमारास शेतात कामानिमित्त गेला असता. त्याला शेतातच विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा दुर्दैव मृत्यू झाला आहे. सदर तरुणास तात्काळ उपचारासाठी कजगाव रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. हा तरुण अविवाहित असून त्याच्या पश्चात आई, वडील, ४ काका, १ भाऊ, १ बहीण असा परिवार आहे. मयत तरुणाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्व परिसरात शोककळा पसरली आहे.

Back to top button