धुळे: केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात युवासेनेची होळी | पुढारी

धुळे: केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात युवासेनेची होळी

धुळे; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या महागाई, बेरोजगारी, हुकूमशाही यासह विविध धोरणाविरोधात धुळे जिल्हा युवासेनेच्या वतीने जुन्या महानगरपालिका चौकात आज (दि. २३) होळी करण्यात आली. आगामी काळात केंद्रासह राज्यात इंडिया आघाडीचे सरकार येण्याची प्रार्थना करण्यात आली. यावेळी केंद्र शासनासह राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख हरीश माळी, उपजिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे, युवती सेना विस्तारक सोनी सोनार, महानगरप्रमुख मनोज जाधव , तालुकाप्रमुख गणेश चौधरी, जिल्हा समन्वयक मोहित वाघ, सिद्धेश नाशिककर, तरबेज शेख, सुमित चौधरी आदीसह युवा सेनेचे पदाधिकारी  उपस्थित होते. केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. तसेच राज्यात पोलीस ठाण्यात गोळीबार होत आहेत. यासह ईडीच्या गैरवापर आणि अन्य अनेक मुद्द्यांच्या निषेधार्थ होळी केली.

सत्ताधाऱ्यांमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. देशातील युवा पिढी बेरोजगार झाली असुन राज्यात नोकरीसाठी त्यांना फिरावे लागत आहे. अशातच पेट्रोल, डिझेल, सिलेंडर, दरवाढ गगनाला भिडली आहे. देशासह राज्यात गोळीबार, टोळीयुद्ध, महिलांवर अत्याचार, शेतकरी आत्महत्या, मनिपूर हिंसाचार, आदी विषयावर  केंद्र सरकार अपयशी ठरल्याची टीका  युवासेनेचे हरीश माळी यांनी केली.

हेही वाचा 

Back to top button