धुळे जिल्ह्यातील शस्त्रपरवाना धारकांनी शस्त्रे जमा करावे; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल

धुळे जिल्ह्यातील शस्त्रपरवाना धारकांनी शस्त्रे जमा करावे; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल

धुळे : पुढारी वृत्तसेवा
धुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 साठी आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुक आचारसंहिता कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांनी ते ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असतील त्या पोलीस ठाण्यामध्ये शस्त्र जमा करावे. असे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहे.

जिल्हाधिकारी गोयल यांनी म्हटले आहे की, गृह विभाग यांचेकडील दि. १७ ऑगस्ट २००९, दि. २० सप्टेंबर २०१४ व दि. ३० मार्च २०१५ मधील मार्गदर्शक सूचनेनुसार धुळे जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांची शस्त्रे आचारसंहिता कालावधीत संबंधित पोलीस ठाण्यात जमा होणेसाठी पोलीस विभागाने कळविले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या कालावधीत लोकसभा निवडणूक मुक्त व निष्पक्ष वातावरणात पार पाडणे आवश्यक असल्याने सार्वजनिक उपद्रव, नुकसान, जिवितास व आरोग्यास तसेच सुरक्षितपणास धोका निर्माण होऊ नये आणि मतदारांत भय, दहशत निर्माण होवू नये यासाठी धुळे जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवानाधारकांनी त्यांनी धारण केलेल्या शस्त्र, परवान्यावरील शस्त्रे संबंधित पोलीस ठाण्यात जमा करावी.

त्याप्रमाणे न्यायाधीश दर्जा, बँकेचे व कॅश वाहतूक करणारे सुरक्षा कर्मचारी, सोने, चांदी व हिरे व्यापारी यांचेकडेस असलेले नोंदणीकृत सुरक्षा रक्षक व नोंदणीकृत खाजगी सुरक्षा रक्षक यांना त्यांचेकडे असलेले शस्त्र जमा करणेबाबत सुट देण्यात आली आहे. तसेच ज्या शस्त्र परवानाधारकांना अत्यावश्यक कारणांमुळे शस्त्र जमा करता येणे शक्य नाही. अशा शस्त्र परवानाधारकांनी गुरुवार, दि. २१ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यत जिल्हादंडाधिकारी धुळे तथा समिती अध्यक्ष, गृह शाखा, जिल्हादंडाधिकारी कार्यालय, धुळे येथे स्वयंस्पष्ट कारणासह स्वतंत्र अर्ज सादर करावा. त्यानुसार प्राप्त अर्जाबाबत छाननी समिती प्रकरणनिहाय निर्णय घेईल, असे जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांनी सांगितले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news