Nashik Crime News | सायबर भामट्यांनी वृद्धास घातला सात लाखांचा गंडा | पुढारी

Nashik Crime News | सायबर भामट्यांनी वृद्धास घातला सात लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मोबाइल क्रमांकावरून सुरू झालेल्या बँक खात्यावर सहा कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे भासवून भामट्यांनी शहरातील ज्येष्ठ नागरिकास सात लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीकांत गजेंद्र शिंदे (६१, रा. शरणपूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, २१ मार्चला सकाळी ८.३० ते १२.३० च्या दरम्यान, भामट्यांनी गंडा घातला. संशयितांनी श्रीकांत यांच्यासोबत मोबाइलवरून संपर्क साधला. ‘तुमच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करून बँक खाते सुरू केले आहे. या बँक खात्यावरून सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला,’ अशी भीती भामट्यांनी श्रीकांत यांना दाखवली. या गैरव्यवहारातून बाहेर पडण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी श्रीकांत यांच्याकडील बँकेची सर्व माहिती घेत त्यातून अ ॉनलाइन पद्धतीने सात लाख ३७ हजार रुपये परस्पर काढून गंडा घातला. सायबर पोलिस भामट्यांचा शाेध घेत आहेत.

विविध शासकीय यंत्रणांच्या नावे बनावट फोन करून कारवाईची धमकी देत नागरिकांना फसविण्यात येत आहे. कारवाई टाळण्याचा दावा करून पैशांची मागणी होते. या स्वरूपाचे फोन आल्यास, त्याची खातरजमा करावी. तसेच सायबर पोलिसांकडे तक्रार करावी. – रियाज शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

हेही वाचा –

Back to top button