Jalgaon Murder | उदारीच्या पैशांसाठी तगादा लावत असल्याने खून, संशयितास 5 तासात अटक | पुढारी

Jalgaon Murder | उदारीच्या पैशांसाठी तगादा लावत असल्याने खून, संशयितास 5 तासात अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – उदारीवर घेतलेले पैसे परत कर म्हणून सारखा तगादा लावत असल्याच्या कारणावरुन एकाचा खून करण्यात आला होता. भडगाव तालुक्यातील बरखेड ते पिंपरखेड दरम्यान असलेल्या दगडाच्या खदानीत साधारण ६० ते ६५ वयोगटातील एकास काहीतरी घातक शस्राने मारहाण करून जिवे ठार मारले होते. याची माहिती घेऊन गुप्त माहितीच्या आधारे खून करणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने 5 तासात अटक केली. (Jalgaon Murder)

भडगाव तालुक्यातील बरखेड ते पिंपरखेड गावाच्या मधील दगडाच्या खदानीत (दि. 8) सकाळी साधारण ६० ते ६५ वयोगटातील इसमास काहीतरी घातक शस्राने मारहाण करून जिवे ठार मारल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन एलसीबी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील व त्याचे पथक पोउपनिरी गणेश वाघमारे, सफौ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, विजय पाटील, रमेश जाधव यांना घेवून घटनास्थळी वरखेड ता. भडगाव जवळील खदान येथे जावून मयताची ओळख पटविली. मयत सुपडु नाना वेलसे, वय ६५, रा.पेठ भाग भडगाव असे मयताचे नाव असल्याने वरील स्थागुशा पथकाने मयताची भडगाव शहरात माहिती घेता गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मयत सूपडू वेलसे हा कुणाल मराठे याचे सोबत होता. त्यावरून कुणाल उर्फ हितेश चुडामण मराठे, वय २१, रा. पेठ भाग भडगाव ता. भडगाव यास ताब्यात घेतले. (Jalgaon Murder)

तेव्हा विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सांगितले की, मी सुपडु वेलसे यांच्याकडून उसनवारीवर पैसे घेतले होते. काही पैसे मी सुपडे वेलसे याला परत केले परंतु तो वांरवार माझ्या कडून पैसे मागून सारखा तगादा लावीत होता. तसेच तो वारंवार माझे घरी येवून मला व माझ्या घरचे लोकांना गल्लीत मोठमोठ्याने अश्लील शिवीगाळ करीत होता. त्यामुळे माझ्या घरची मंडळी माझे आई व वडील हे घर सोडून निघून गेले होते. त्यामुळे सुपडु वेलसे यास दि. ७ रोजी तुझे उधारीचे पैसे द्यायचे आहे असे सांगून त्याला एंडोल रस्त्याला बोलावून पिपरखेडला एकजण पैसे देणार आहे असे  सांगितले. त्याचे कडून घेवून तुला देतो असे सांगून सुपडे वेलसे यास माझे मोटार सायकल वर बसवुन त्यास वरखेड गावाचे पुढे पिंपरखेड गावाचे दिशेने घेवून जावून उजव्या बाजुस असलेल्या दगडाच्या खदानीत त्याला घेवून जावून तिथे मोटार सायकल वरून उतरवून त्यास माझ्या जवळ असलेल्या चॉपरने मी त्यास मारले आहे, अशी कबुली दिली. त्यावरून त्यास ताब्यात घेवून गुन्ह्याचे पुढील तपासकामी भडगाव पो.स्टे.चे ताब्यात दिले आहे.

हेही वाचा –

Back to top button