Jalgaon News | प्रवासी तरुणाने लगावली महिला कंडक्टरच्या कानशिलात, गुन्हा दाखल | पुढारी

Jalgaon News | प्रवासी तरुणाने लगावली महिला कंडक्टरच्या कानशिलात, गुन्हा दाखल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- तालुक्यातील कंडारी गावात बसला थांबा नसल्याने नेरी गावापर्यंत तिकीट काढावे लागेल असे सांगितल्याच्या कारणावरून बसमधील महिला कंडाक्टरशी वाद घालून त्यांच्या कानशिलात लागवल्याची धक्कादायक घटना इच्छादेवी चौकात शुक्रवारी दि. ३ मे रोजी सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव ते जामनेर या बसमध्ये करण कमलसिंग परदेशी वय २० रा. कंडारी ता. जळगाव हा तरूण जळगाव बसस्थानकातून बसमध्ये चढला. शुक्रवारी ३ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बस इच्छादेवी चौकातून जात असतांना महिला कंडाक्टर सुरेखा प्रविण पाटील वय-२५ रा. जामनेर यांनी कंडारी गावाला थांबा नसल्याचे करण परदेशी याला सांगितले. त्यामुळे नेरी पर्यंतचे तिकीट काढावे लागले असे महिला कंडक्टर यांनी सांगितले. यामुळे करण परदेशी याने महिला कंडक्टर यांच्याशी वाद घालून दमदाटी केली. त्यानंतर त्यांच्या कानशिलात चापटाने मारहान करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर महिला कंडक्टर सुरेखा पाटील यांनी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार रात्री ८ वाजता मारहाण करणारा करण कमलसिंग परदेशी रा. कंडारी ता.जळगाव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे हे करीत आहे.

हेही वाचा-

Back to top button