धुळे पुढारी वृत्तसेवा- धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे, 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील तळमजला लगतची याठिकाणी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत 895 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) तथा नोडल अधिकारी संदीप पाटील यांनी दिली आहे.