Jalgaon temperature | भुसावळात यावर्षीच्या सर्वांधिक तापमानाची नोंद, पारा 45.1 अंशावर | पुढारी

Jalgaon temperature | भुसावळात यावर्षीच्या सर्वांधिक तापमानाची नोंद, पारा 45.1 अंशावर

जळगाव : जिल्ह्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जळगाव शहराचे तापमान 43.2 वर पोहोचले असून भुसावळचे तापमान त्यापेक्षाही 45.1 अंशावर गेले आहे. ही यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये सर्वांधिक तापमान झाल्याची नोंद आहे. यापूर्वी एप्रिल 2019 मध्ये 45.4 अंश तापमानाची नोंद झालेली होती.

राज्यामध्ये सर्वाधिक तापमानाचा जिल्हा म्हणून जळगाव जिल्हा ओळखला जातो. यामध्ये जळगाव व भुसावळ या दोन्ही तालुक्यांमध्ये उन्हाच्या पाऱ्याची स्पर्धा लागलेली दिसून येते आहे. जळगाव शहराचे तापमान 43.2 वर पोहोचले असून किमान 26.6 व आद्रता ६० टक्के आहे. तर भुसावळ शहर 45.1 किमान 27 व आद्रता 28.2 टक्के वर केंद्रीय जल आयोगामध्ये नोंद झालेली आहे. उन्हाचा वाढता पारा व भुसावळ- जळगाव झालेली हॉट सिटी यामुळे दवाखान्यात चक्कर, मळमळ, उलटी होणे, अशक्तपणा असे लक्षणे असलेले रुग्णांची संख्या वाढत आहे.

हेही वाचा –

Back to top button