Sindhudurg crime news : म्हाळुंगे येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा वार करून निर्घृण खून; पतीला अटक | पुढारी

Sindhudurg crime news : म्हाळुंगे येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा वार करून निर्घृण खून; पतीला अटक

देवगड, पुढारी वृत्तसेवा : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा सुऱ्याने वार करून निर्घृण खून केला. ही घटना म्हाळुंगे धनगरवाडा (ता.देवगड) येथे शुक्रवारी (दि. १९) सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. सुनील सदानंद पेडणेकर (वय ५८) असे संशयित पतीचे नाव, तर सुप्रिया सुनील पेडणेकर (वय ५०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. विजयदुर्ग पोलिसांनी पती सुनील याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. Sindhudurg crime news

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे धनगरवाडी येथे पत्नी व मुलगा सिद्धेश (वय २७) यांच्यासोबत सुनील पेडणेकर राहत होता. त्याआधी तो २०२२ पर्यंत पत्नी व मुलासमवेत मुंबईत राहत होते. त्यांचे स्वतःचे मेडिकल होते, ते विकून म्हाळुंगे धनगरवाडा येथे राहायला आले होते. येथे त्यांनी घर बांधले होते. Sindhudurg crime news

दरम्यान, सुनील हा पत्नीवर संशय घेत होता. या संशयातून त्यांच्यामध्ये वारंवार भांडणे होत होती. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास स्वयंपाक घरातून भांडणाचा आवाज आला. यावेळी मुलगा सिद्धेश बाहेरून आत आला असता त्याला आई खाली पडलेल्या स्थितीत दिसली. व वडील तिच्या हातावर, छातीवर सुऱ्याने वार करत होते. सिद्धेश यांने वडिलांना बाजूला करून त्यांच्या हातातून सुरा काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या हातालाही जखम झाली.

त्यांने सुरा काढून वडिलांना एका बाजूलाबसविले. व तत्काळ म्हाळुंगे पोलीस पाटील आत्माराम तोरसकर व विजयदुर्ग पोलीस स्टेशनला फोन लावून कळविले. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत जाधव, विलास राठोड, गणेश भावंड, संतोष डामरे, पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र मुंबरकर, विक्रम कोयंडे यांनी घटनास्थळी धाव घेत संशयित सुनील याला ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पंचनामा केला.

दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक थोपडे, आणि कर्मचारी तसेच ठसेतज्ञ टीम दाखल झाली.

सिद्धेश मुंबईत असताना ग्राफिक डिझायनरचे काम करीत होता. म्हाळुंगे येथे आल्यानंतर तो वर्क फॉर्म होम काम करत होता. तर वडील हे घरीच असायचे.

हेही वाचा 

Back to top button