जळगाव : महाविकास आघाडीच्या उमेदवाराविनाच बैठका सुरू | पुढारी

जळगाव : महाविकास आघाडीच्या उमेदवाराविनाच बैठका सुरू

जळगाव- लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मात्र महाविकास आघाडीचे रावेर व जळगाव लोकसभेचे उमेदवार अजूनही जाहीर झालेले नाहीत. असे असतानाही महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यातर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन कारण्यात आले. महाविकास आघाडीचा जो ही उमेदवार घोषित केला जाईल त्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचे आवाहन कारण्यात आले .

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचारानिमित्त दि. 23 जळगाव लोकसभा मतदारसंघाची महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्रभैय्या पाटिल, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या अध्यक्षते खाली व राष्ट्रवादी कॉंग्रेस महानगर जिल्हाअघ्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या प्रमुख उपस्थितितीमध्ये प्रचार नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन कारण्यात आले महाविकास आघाडीचा जो ही उमेदवार घोषित केला जाईल त्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचे आवाहन कारण्यात आले. सदर बैठकीस शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना उद्धव ठाकरे गट जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, शिवसेना ठाकरे गट महानगराध्यक्ष शरद तायडे, अॅड ललिता पाटिल, मंगला पाटिल, वाल्मिक पाटिल, माजी उप महापौर कुलभूषण पाटिल, सुनील महाजन, महजरभाई पठाण, विकास पवार, नामदेव वाघ, इब्राहिम तडवी, अनंत जोशी, इबाभाई पटेल, लीलाधर तायडे, विराज कावडिया, रमेश पाटिल, उमेश पाटिल, रिकु चौधरी, पियुष गांधी, गायत्री सोनवने, मनीषा पाटिल, प्रतिभा शिरसाठ, शालिनी सोनवने, कलाबाई शिरसाठ, शीतल माशाने, गणेश गायकवाड, सुनीलभैय्या माळी, किरण राजपूत, राजू मोरे, गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर, रियाझ काकर, अकबर पेहलवान, प्रशांत फाळके, डॉ रिझवान खाटीक , रहीम तडवी, अशोक सोनवने, रमेश बाऱ्हे, उनेश पाटिल, जाकीर पठाण, अकील पटेल,चेतन पवार, कुंदन सूर्यवंशी, भगवान सोनवने, शब्बीर शाह, बशीर शाह,दत्तात्रय सोनवने आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button