Dhule Lok Sabha Election 2024 | राजकीय पक्ष, उमेदवारांना विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना कक्ष | पुढारी

Dhule Lok Sabha Election 2024 | राजकीय पक्ष, उमेदवारांना विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना कक्ष

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधींना प्रचार विषयक विविध परवानगी प्राप्त करणे सोईचे व्हावे, याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात एक खिडकी योजना कक्ष (सुविधा) स्थापन करण्यात आला असून तसे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी निर्गमित केले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधींना प्रचार विषयक विविध परवानगी देणेकामी एकसुत्रिपणा येण्याच्या दृष्टीने या कक्षांची स्थापना करण्यात आल्याचेही आदेशात म्हटले आहे.

एक खिडकी कक्षात असे मिळतील परवाने

वाहन परवाना :

नोंदणीकृत राजकीय पक्ष, नोंदणीकृत पक्षाचे जिल्हास्तरीय पदाधिकारी, उमेदवार/प्रतिनिधी यांना धुळे जिल्हा कार्यक्षेत्रात तसेच लोकसभा मतदार संघासाठी वाहनपरवाना जिल्हाधिकारी कार्यालयातील नोडल अधिकारी जिल्हास्तरीय एक खिडकी कक्ष येथे वितरीत करतील. त्याचप्रमाणे उमेदवार/प्रतिनिधींना विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात वरील परवानगीसाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हे एक खिडकी कक्षामार्फत आवश्यक परवाने वितरीत करतील.

वाहनपरवाना प्राप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

वाहनधारकांचे संमतीपत्र, प्रतिदिन ठरलेल्या भाड्याच्या रक्कमेचा तपशिल, आर.सी.बुक, एम.व्ही.टी यांची छायांकीत प्रत, वाहनविमा, फिटनेस सर्टिफिकेट, व्यवसायीक वाहन असल्यास वैध परवाना, चालकाचा परवाना, पीयुसी प्रत, वाहनाचा चारही बाजुचा फोटो वाहन नंबर सहित, वाहनावर जाहिरात करावयाची असल्यास परिवहन विभागाची पावती, वाहनावर स्पीकर वापरणेसाठी संबंधित क्षेत्रातील पोलीस विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकारी यांना आवश्यक वाटतील अशी अन्य कागदपत्रे आवश्यक आहे. हे ना-हरकत प्रमाणपत्र परिवहन विभागामार्फत देण्यात येतील.

तात्पुरते पक्ष कार्यालय उभारणे :

विधानसभा मतदारसंघात तात्पुरते पक्ष कार्यालय उभारण्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी हे एक खिडकी कक्षात तात्पुरते पक्ष कार्यालय उभारण्यासाठी परवाने वितरीत करतील. यासाठी संबंधित जागा मालक यांचे संमतीपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ठरलेल्या भाड्याच्या रक्कमेचा तपशिल, संबंधित क्षेत्रातील पोलीस विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र, सक्षम अधिकारी यांना आवश्यक वाटतील अशी अन्य कागदपत्रे आवश्यक असून हे ना-हरकत प्रमाणपत्र पोलीस विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत देण्यात येतील.

कॉर्नर सभा, प्रचारसभेसाठी मैदान परवाना, लाऊडस्पीकर :

विधानसभा मतदारसंघात कॉर्नर सभा, प्रचारसभेसाठी मैदान परवाना, लाऊडस्पीकरसाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी हे एक खिडकी कक्षात हे परवाने वितरीत करतील. या परवान्यांसाठी संबंधित जागा मालक यांचे संमतीपत्र, संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे नाहरकत प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र, शिक्षणसंस्था यांचे मालकीची जागा असल्यास संस्थेचे संमतीपत्र, स्वतंत्र प्रवेशमार्ग व बाहेर जाण्याचा मार्ग असे हमी पत्र, संबंधित क्षेत्रातील पोलीस विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र, तसेच सक्षम अधिकारी यांना आवश्यक वाटतील अशी अन्य कागदपत्रे आवश्यक असून हे ना-हरकत प्रमाणपत्र पोलीस विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत देण्यात येतील. तसेच शैक्षणिक संस्था असल्यास संस्था व्यवस्थापन यांचे नाहरकत प्रमाणपत्र, संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील.

रॅली, मिरवणूक, रोड शो, पदयात्रा, पथनाट्य, लाऊडस्पीकर :

विधानसभा मतदारसंघात रॅली, मिरवणूक, रोड शो, पदयात्रा, पथनाट्य, लाऊडस्पीकरसाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी हे एक खिडकी कक्षात हे परवाने वितरीत करतील. या परवान्यासाठी अर्ज, रॅली, मिरवणूक, रोड शो, पदयात्रा मार्गाचा आराखडा, परिवहन विभागाचे नाहरकत पत्र, रॅली, मिरवणूक, रोड शो पदयात्रा मार्गाचा आराखड्यास पोलीस विभागाची परवानगी, रॅली, मिरवणूक, रोड शो, पदयात्रामध्ये वाहन वापरावयाचे असल्यास परिवहन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र, स्पीकर वापरावयाचा असल्यास पोलीस विभागाकडील नाहरकत प्रमाणपत्र, तसेच सक्षम अधिकारी यांना आवश्यक वाटतील अशी अन्य कागदपत्रे आवश्यक असून हे ना-हरकत प्रमाणपत्र पोलीस विभाग व वाहतूक नियंत्रण विभागामार्फत देण्यात येतील.

स्टेज, बॅरिकेट, रोस्ट्रम :

विधानसभा मतदारसंघात स्टेज, बॅरिकेट, रोस्ट्रमसाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी हे एक खिडकी कक्षात हे परवाने वितरीत करतील. या परवान्यांसाठी संबंधित जागा मालक यांची संमती, स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाहरकत प्रमाणपत्र, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य व विद्युत) नाहरकत प्रमाणपत्र, अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक असून हे ना-हरकत प्रमाणपत्र पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य व विद्युत), अग्निशमन विभागामार्फत देण्यात येतील.

हेलीपॅड बांधकाम परवाना व हेलीकॉप्टर लँडिग परवाना :

संपुर्ण धुळे जिल्हा हेलीपॅड बांधकाम व हेलीकॉप्टर लँडिग परवानासाठी गृहशाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे व पोलीस विभाग हे परवाने वितरीत करतील. या परवान्यांसाठी संबंधित जागा मालक यांची संमती, स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाहरकत प्रमाणपत्र, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (स्थापत्य व विद्युत) नाहरकत प्रमाणपत्र, अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक असून हे ना-हरकत प्रमाणपत्र पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य व विद्युत), अग्निशमन विभागामार्फत देण्यात येतील.

फ्लेक्स बोर्ड, झेंडे, होर्डिग्स, बॅनर, पोस्टर्स इत्यादी प्रचार साहित्य :

विधानसभा मतदारसंघात फ्लेक्स बोर्ड, झेंडे, होर्डिग्स, बॅनर, पोस्टर्स इत्यादी प्रचार साहित्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी हे एक खिडकी कक्षात हे परवाने वितरीत करतील. या परवान्यांसाठी इमारतीवर झेंडे, पोस्टर, बॅनर्स लावण्यासाठी परवानगी देतांना संबंधित जागा मालकांची संमती पत्र, भाडे पावती, वाहतूकीस अडथळा होणार नाही अशा पद्धतीने पोस्टर्सचे प्रदर्शन करणेची दक्षता घेणेबाबतचे व ज्या कालावधीसाठी प्रदर्शित करावयाचे आहे तो कालावधी संपुष्ठात आल्यानंतर उतरविणेची जबाबदारी राहील असे प्रतिज्ञापत्र, एम.एस.ई.डी.सी.एल कडील नाहरकत प्रमाणपत्र (विजवाहक तारांना अडथळा होवून दुर्घटना न होण्याच्या दृष्टिकोनातून), संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था/ग्रामपंचायत यांचेकडील नाहरकत प्रमाणपत्र, पोस्टर्स इत्यादी बाबतीत मजकुराची छपाईसाठी एससीएमसी कमिटी, संबंधित स्थानिक प्राधिकरणाचा ना हरकत दाखला, सक्षम अधिकारी यांना आवश्यक वाटतील अशी अन्य कागदपत्रे आवश्यक असून हे ना-हरकत प्रमाणपत्र जिल्हा माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती, एम.एस.ई.डी.सी.एल, स्थानिक स्वराज्य संस्था/ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येतील.

तरी धुळे जिल्ह्यातील तसेच 02 धुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधींनी प्रचार विषयक विविध परवानगी प्राप्त करुन घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातील एक खिडकी योजना कक्षाचा (सुविधा) लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गोयल यांनी केले आहे.

हेही वाचा-

Back to top button