Gold Rate Today | ऐन लग्नसराईत सोने महागले! दराचा नवा उच्चांक, पहिल्यांदाच ६६ हजारांजवळ

Gold Price Today
Gold Price Today
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात तेजी कायम असून आज बुधवारी सोने दराने सर्वकालीन उच्चांक गाठला. शुद्ध सोन्याचा दर आज प्रति १० ग्रॅम ६५,७९५ रुपयांवर खुला झाला. काल मंगळवारी सोन्याचा दर ६५,५८९ रुपयांवर बंद झाला होता. आज सोन्याच्या दरात २०८ रुपयांची वाढ दिसून आली. याआधी ११ मार्च रोजी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६५,६४६ रुपयांवर गेला होता. आता सोने ६६ हजारांजवळ पोहोचले आहे. तसेच चांदीच्या दर प्रति किलो ७३,८५९ रुपयांवर खुला झाला आहे. (Gold Rate Today)

इंडियन बुलियन अॅड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ६५,७९५ रुपये, २२ कॅरेट ६०,२६८ रुपये, १८ कॅरेट ४९,३४६ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ३८,४९० रुपयांवर खुला झाला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ७३,८५९ रुपयांवर खुला झाला आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज दुपारी दीड वाजता ५ एप्रिल डिलिव्हरी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६५,६०० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. तर ३ मे डिलिव्हरी चांदीचा दर प्रति किलो ७५,१२० रुपयांवर होता.

जगभरात मंदीची शक्यता, लग्नसराईत सोन्याची वाढलेली मागणी ही सोने दरवाढीमागील प्रमुख कारणे आहेत. मार्च महिन्यांत सोन्याच्या दरात सुमारे ३,२०० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीचा दर ७४ हजारांच्या दिशेने वाटचाल करत आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. पण, दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे नमूद केलेले असते. (Gold Rate Today)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news