Dhule News : पांझरा नदी स्वच्छतेसाठी एकवटले हजारो हात | पुढारी

Dhule News : पांझरा नदी स्वच्छतेसाठी एकवटले हजारो हात

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे शहराची जिवनदायनी असलेल्या पांझरा नदीच्या स्वच्छतेसाठी सातत्याने स्वच्छता मोहिम सुरु राहणार असुन नागरीकांनी स्वंयस्फुर्तीने या मोहिमेत सहभागी व्हावे व स्वच्छतेची चळवळ प्रत्येक घराघरात पोहचवावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आज पांझरा नदी स्वच्छता मोहिमेच्या प्रसंगी व्यक्त केले.

डिप क्लीन ड्राईव्ह व रन फॉर पांझरा या उद्देशाने शहरातील पांझरा नदीची स्वच्छता मोहिम आयोजित केलेली होती. आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या मागदर्शनाखाली या मोहिमेचे यशस्वी नियोजन करण्यांत आले होते. या मोहिमेत जिल्हा परिषद कार्यकारी मुख्याधिकारी शुभग गुप्ता तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकांत धीवरे सपत्नीक उपस्थित होते. तसेच अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, मनपा अति. आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त डॉ. संगिता नांदुरकर, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, वनविभागाचे अधिकारी नितीन सिंग, वाहतुक शाखेचे सहायक पोलिस निरिक्षक भुषण कोते, अभिजित पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

आज वीर सावरकर पुतळयाजवळ शहराच्या विविध विभागातून शालेय विद्यार्थी, पोलिस विभागाचे जवान व पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी ,स्काऊट गाईड व एन.सी.सी. चे विद्यार्थी स्वच्छतेच्या घोषणा देत उपस्थित झाले. मोहिमेच्या प्रारंभी वीर सावरकर यांच्या पुतळयास मान्यवरांतर्फे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यांत आले. छोटा पुल ते मोठा पुल या नदीपात्राची संपूर्ण स्वच्छता या प्रसंगी करण्यांत आली. त्यासाठी गटनिहाय परिसर नेमुन देऊन आनंदी उत्साहाच्या वातावरणात नदी स्वच्छतेला प्रारंभ झाला .विद्यार्थ्यांच्या घोषणा व स्वच्छतेच्या गितांनी परिसरात चैतन्य निर्माण झालेले होते. या मोहिमेत 8 टॅक्टर, 1 हायवा, 3 जेसीबी मशिन, 1 पोकलैंड मशिन, स्वच्छतेकामी कार्यरत होते. नदीपात्रात सुमारे 2 ते 3 हजार असलेल्या जनसमुदायामुळे पात्रात रंगबिरंगी चित्र निर्माण झालेले होते. पात्रालगतची स्वच्छता फायर फायटर व टँकरव्दारे करण्यांत आली. नदीपात्रातील सर्व झाडे झुडपे, पाण वनस्पती, जलपर्णी, काढण्यांत आल्या. तसेच नदीपात्रातील पाणी वाहते करण्यांत आले स्वतः जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधिक्षक व अन्य उपस्थित मान्यवरांनी मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी होवून कचरा संकलित केला. त्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या मोहिमेअंतर्गत सुमारे 55 टन कचरा संकलित करण्यात आला. यापुढेही अशा स्वरुपाची मोहिम कार्यरत ठेवण्यांत येणार आहे.

काल झालेल्या स्वच्छता मोहिमेत राज्य राखीव पोलिस दलाचे जवान तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांचे जवान व प्रशिक्षणार्थी, सर्व पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक, वाहतुक विभागाचे पोलिस कर्मचारी, सार्व. बांधकाम विभागाचे पथक प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी, क्रिडा विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच पंचशील विद्यार्थी वसतीगृह लालबहादुर शास्त्री विद्यार्थी वसतीगृह आदिवासी मुलांचे वसतीगृह राजेंद्र छात्रालय जिजामाता कन्या विद्यालय, जो. रा. सिटी हायस्कुल चे विद्यार्थी ज्येष्ठ नागरीक संघाचे पदाधिकारी, सुवर्णकार युवक संघटनेचे पदाधिकारी, रोटरी क्लब व विविध सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी
मोठया संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button