Nashik Drug Case : लक्ष विचलीत करण्यासाठी सुषमा अंधारेंकडून आरोप : दादा भुसे | पुढारी

Nashik Drug Case : लक्ष विचलीत करण्यासाठी सुषमा अंधारेंकडून आरोप : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राज्यातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी युतीच्या सरकारकडून जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्याकडून आराेप करण्याचा केविलवाणा प्रयत्न होत असल्याचे, पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. (Nashik Drug Case)

पत्रकार परिषदेत बोलताना भुसे म्हणाले, एमडी ड्रग्जची कारवाई होताच पाेलिस आयुक्तांना फाेन करून या प्रकरणातील गुन्हेगारांवर कठाेर कारवाई करण्याचे आदेश दिले. अंमली पदार्थाच्या प्रकरणात काेणाचेही समर्थन हाेवू शकत नाही. पोलिस तपासात अडथळे निर्माण करण्यासाठी सुषमा अंधारे यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे. त्यांनी आराेप करताच आपण आंतराष्ट्रीय पातळीवर चाैकशी करण्याचे जाहीर आव्हान दिल्याचेही भुसे यांनी सांगितले. ललित पाटील याच्या पक्षप्रवेशावेळी आपण राज्यमंत्री असल्याने व नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने पक्षप्रवेशांच्या कार्यक्रमांना उपस्थित असायचाे. त्यावेळी स्थानिक पदाधिकारी विनायक पांडे यांच्या माध्यामातून ललित पाटीलचा प्रवेश झाला हाेता. ड्रग्जमाफिया ललीत पाटील याला पकडल्यावर त्याच्या चाैकशीतून अनेक बाबी समोर येतील, असेही भुसे यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button