Israel Hamas War : 8 महिन्यांपूर्वीच चीन-अमेरिकेने लिहिली इस्रायल युद्धाची पटकथा | पुढारी

Israel Hamas War : 8 महिन्यांपूर्वीच चीन-अमेरिकेने लिहिली इस्रायल युद्धाची पटकथा

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था :  हमासने अल अक्सा या मशिदीची इस्रायल पोलिसांकडून विटंबना हे युद्धाचे कारण सांगितलेले असले, तरी हमासच्या या हल्ल्याची पटकथा 8 महिन्यांपूर्वीच अमेरिका आणि चीनने मिळून अप्रत्यक्षपणे लिहिलेली होती.

मध्यपूर्वेतील वर्चस्वासाठी चीन आणि अमेरिका यांच्यातील स्पर्धेनेही इस्रायल-हमास संघर्षाला हवा दिलेलीच आहे. हमासच्या, आमचा इस्रायलवरील हल्ला हा इस्रायलशी मैत्री वाढविणार्‍या अरब देशांनाही इशारा आहे, या वक्तव्यात सारे काही आलेले आहे. हमासचा रोख अर्थातच सौदी अरेबियावर होता. सौदीचे शासक प्रीन्स सुलतान हे इस्रायलला एक देश म्हणून मान्यता देण्याच्या मूडमध्ये होते. सौदी आणि इस्रायलमधील हा करार अमेरिकेच्या मध्यस्थीने होणार होता. अमेरिकेने हा पुढाकार घेण्यामागचे कारण म्हणजे, चीनने यापूर्वी सौदी अरेबिया आणि इराण या टोकाचे पूर्ववैमनस्य असलेल्या दोन देशांमध्ये मैत्री घडवून आणण्यात यश मिळविले होते.

Back to top button