धुळे : दिव्यांग अंगणवाडी सेविकेचा सत्यशोधक पद्धतीने विवाह | पुढारी

धुळे : दिव्यांग अंगणवाडी सेविकेचा सत्यशोधक पद्धतीने विवाह

पिंपळनेर(जि. धुळे) : पुढारी वृत्तसेवा; लग्न म्हटले म्हणजे मुहूर्त, मंडप, वाजंत्री यावर वारेमाप पद्धतीने खर्च होत असतो. वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना आता हा खर्च परवडेनासा झाला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींना फाटा देत पिंपळनेर येथे सत्यशोधक पद्धतीने दिव्यांगाचा विवाह पार पडला. साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे दिव्यांग अंगणवाडी सेविकेचा सत्यशोधक पद्धतीने विवाह झाला. या निर्णयाचे परिसरातून कौतुक होत आहे.

संबधित बातम्या :

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील सगरवंशीय जिरेमाळी समाजातील रवींद्र नारायण पगारे यांची दिव्यांग कन्या छाया रवींद्र पगारे हिला पाहण्यासाठी धुळे येथील (फागणे) ह.मु.साक्री येथील कै.भटू बाबूराव पाटील यांचे दिव्यांग चिरंजीव जितेंद्र भटू पाटील हे पिंपळनेर येथे मुलगी पहाण्यासाठी आले. दोन्ही पक्षांनी वधू-वर पसंतीचा कार्यक्रम केला व लगेचच दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

यासाठी मुलीचे वडील रवींद्र पगारे, आई भिमाबाई पगारे, काका रामकृष्ण पगारे, डॉ. गोविंद पगारे, भाऊ चेतन पगारे, मामा डिगंबर साळवे, जावई महेश नंदन यांनी व मुलाचे बंधू दिनेश पाटील, आई मंदाकिनी पाटील यांनीही लगेच होकार दिला. सायंकाळी 7 वाजता, घरातच वरास टोपी, टॉवेल, कपडे व श्रीफळ देऊन, लगेच दोघांना हळद लावली. कुठलाही विधी न करता साध्या पद्धतीने हा विवाह पार पाडून समाजासमोर आदर्श निर्माण केला.

यावेळी सत्यशोधक विधीकर्ते सुभाष जगताप यांनी वर-वधूस सत्यशोधक विचार सांगितले. मंगलाष्टक ह.भ.प.विजय महाजन काळे पाटील यांनी म्हटले. या आदर्श विवाहास अॅड. ज्ञानेश्वर एखंडे, माजी सरपंच शीलनाथ एखंडे, मोहन संपतराव पाटील, भा.ज.प.चे मंडल सचिव रामकृष्ण एखंडे, शामकांत सुपडू पगारे, महेश नंदन, गिरिष पगारे, पांडुरंग सीताराम नंदन, डॉ. ज्ञानेश्वर पगारे, संजय साळवे, श्रावण गावित उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button