शहागड, पुढारी वृत्तसेवा: अंबड तालुक्यातील सिद्धेश्वर फाटा गोंदी येथे गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करत ४ ट्रकसह पाच ब्रास वाळू असा ५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई आज (दि.७) सकाळी गोंदी पोलिसांनी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र ठाकरे, शहागड पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत, जमादार मदन गायकवाड, बाबासाहेब खवले, संतोष डोईफोडे, गोपनीय शाखेचे सचिन साळवे, अविनाश पगारे, सिदि्की यांनी केली.
हेही वाचा