Meri Mitti Mera Desh : लासलगाव येथे ‘अमृत कलश यात्रा’ | पुढारी

Meri Mitti Mera Desh : लासलगाव येथे 'अमृत कलश यात्रा'

लासलगाव (जि.नाशिक) वार्ताहर,  ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ (Meri Mitti Mera Desh) या अभियाना अंतर्गत “अमृत कलश” यात्रेचे आयोजन  लासलगाव येथे करण्यात आले. या कलश यात्रेमध्ये येथील जेष्ठ नागरिक संघ, लोकनेते दत्ताजी पाटील माध्य. आणि उच्च माध्यमिक विद्यालय, श्री महावीर विद्यालय लासलगावचे शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर असोसिएशन, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या, बचत गट प्रतिनिधी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.

सरपंच जयदत्त होळकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून प्रभात फेरीची सुरवात करण्यात येऊन पंचप्राण शपत घेऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. पारंपरिक वाद्याच्या गजरात ग्रामपंचायत कार्यालय समोरून प्रभात फेरीला सुरवात होऊन गावंतर्गत मिरवणूक काढण्यात आली. प्रभात फेरी मध्ये ‘मेरी मिट्टी मेरा देश’,  माझी माती माझा देश, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या.

संबधित बातम्या :

तसेच माझी माती, माझा देश या आशयाचा बॅनर प्रभात फेरी द्वारे झळकताना दिसून आले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर व ट्रॉली सजविले होते. सजविलेल्या ट्रॉलीमध्ये ८ फुटी कलश ठेवून सुशोभीकरण केले होते.  फेरी दरम्यान कलशामध्ये गावातील शेतकरी बांधव यांनी एक मूठ माती व ज्यांच्याकडे शेती नाही अशांनी एक मूठ तांदूळ टाकले. गावातून प्रभातफेरी ग्रामपंचायतीचे पटांगणावर आल्यावर येथे उपस्थितांनी पंचप्राण प्रतिज्ञा घेण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच जयदत्त होळकर, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर होळकर, अफजल शेख, रोहित पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक होळकर, डॉ.कैलास पाटील, त्रंबकराज बिरार, अरविंद देसाई, विस्तार अधिकारी सुधाकर सोनवणे, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, ग्रामविकास अधिकारी धिवर साहेब, लासलगाव ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button