Nashik Crime : पोलिस चौकीच्या मागेच स्कॉर्पिओची चोरी (CCTV) | पुढारी

Nashik Crime : पोलिस चौकीच्या मागेच स्कॉर्पिओची चोरी (CCTV)

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा; खुटवडनगर पोलीस चौकीच्यामागे चोरट्यांनी घरासमोर उभी असलेली स्कॉर्पिओ चोरून नेली. अर्धा तास चाललेल्या चोरीची सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

खुटवडनगर पोलीस चौकीच्या मागच्या बाजूला ५० मीटर अंतरावर विलास भैय्यासाहेब पाटील (६३) यांचा आदेश नावाचा बंगला आहे. त्यांनी त्यांची स्कॉर्पिओ (एमएच १५ एचसी ६६४७) घराबाहेर लावली असताना, बुधवारी (दि. २७) पहाटे चारचाकी कारमध्ये आलेल्या तिघांनी स्कॉर्पिओ चोरून नेली. याबाबत पाटील यांनी तत्काळ पोलीस चौकीला जाऊन तक्रार केली. मात्र नेहमीप्रमाणे खुटवडनगर पोलीस झोपलेले होते. तर चौकीच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारदारांनाच अरेरावीची वागणूक देत अंबड पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. याबाबत येथील माजी नगरसेवक तानाजी जायभावे, माजी नगरसेविका अलका आहिरे यांनी पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त केला. या प्रकरणी अखेर अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :

Back to top button