धुळे: बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणाचा दुसरा बळी; बळसाणे फाट्याजवळ पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू | पुढारी

धुळे: बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणाचा दुसरा बळी; बळसाणे फाट्याजवळ पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्धवट कामामुळे वाहनधारकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रस्त्याच्या मधोमध मुरुमाचे मोठमोठे ढीग टाकण्यात आले असून यामुळे वाहन धारकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.

इंदवेचे पोलीस पाटील मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास दुसाणे येथून परत जाताना बळसाणे फाट्याजवळ त्यांचा अपघात झाला. दुसाणे येथील पुलाच्या रखडलेल्या कामामुळे अवजड वाहनांना मनाई करण्यासाठी रस्त्याच्या मधोमध मुरुमाचे मोठमोठे ढीग टाकण्यात आले आहेत. या मुरुमाच्या ढिगावर संतोष सोनवणे यांची दुचाकी (एमएच.18.बी.यू.4495) घसरली. यात ते वीस ते तीस फूट घसरत गेले व रस्त्यावर जोरात आदळले. यात सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

चार दिवसांत दुसरा बळी

याच ठिकाणी दुसाणे येथील खंडू सूर्यवंशी यांचा गेल्या चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्याच ठिकाणी इंदवे येथील पोलिस पाटील संतोष सोनवणे यांचा मृत्यू झाल्याने आणखी एक जीव गमवावा लागला. दुसाणे येथील पुलाचे राहिलेले अर्धवट काम तातडीने पूर्ण करून रस्ता मोकळा करावा. संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

हेही वाचा 

Back to top button