कांदा प्रश्नावर चार-पाच दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ : गिरीश महाजन | पुढारी

कांदा प्रश्नावर चार-पाच दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ : गिरीश महाजन

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा संकटमोचक गिरीश महाजन यांनी शनिवारी लासलगाव येथे बाजार समितीच्या आवारात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर बोलताना सांगितले.

यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकार हे शेतकरी हिताचे असून कायम तुमच्या पाठीशी भक्कम उभे आहे. येत्या चार-पाच दिवसात राज्य सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. नाफेडने लासलगाव येथे अल्पकांदा खरेदी केली आहे. नांदेडचे सध्या 45 सेंटर आहे. त्याऐवजी वाढवून 60 सेंटर सुरू करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य सरकारने कांदा अनुदान 350 रुपये दिले आहे. त्याचे वितरण दोन टप्प्यात होणार असून मंजूर 865 कोटी अनुदानापैकी पहिला टप्पा 465 कोटी मंजूर झाला असून त्यापैकी एकट्या नाशिक जिल्ह्याचा वाटा 435 कोटीचा आहे. कांदा प्रश्नसंदर्भात शासन स्तरावर राज्य सरकार व्यापारी प्रतिनिधी व शेतकरी प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी माजी सभापती सुवर्णा जगताप, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, व्यापारी मनोज जैन, बाजार समिती सदस्य डीके जगताप, केदार नवले, निवृत्ती न्याहारकर, हीरामण घोडे, प्रकाश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर बाजार समितीचे माजी सभापती पंढरीनाथ थोरे, उपसभापती गणेश डोमाडे, जिल्हाधिकारी जलल शर्मा, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, बीजेपी संघटन मंत्री विजय चौधरी, बीजेपी जिल्हाध्यक्ष शंकर वाघ, सुनील बच्छाव, कैलास सोनवणे, रमेश पालवे, भीमराज काळे, बबन शिंदे, तुकाराम गांगुर्डे, डॉ. रमेश सालगुडे, निलेश सालकाडे, उपसरपंच मेघा दरेकर, उत्तम शिंदे, निलेश जगताप, स्मिता कुलकर्णी, रूपा केदारे, शैलजा भावसार, रंजना शिंदे, ज्योती शिंदे उपस्थित होते.

दरम्यान शनिवारी नाफेडच्या नोड्युल एजन्सी फार्मर प्रोडूसर कंपनीने 9 ट्रॅक्टर मधून 200 क्विंटल 2410 रु खरेदी केले.
नाफेड ने पहिला ट्रॅक्टर चांदवड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील सुरेखा कोकणे यांचा 25 क्विंटल कांदा शुभारंभ प्रसंगी खरेदी केला.
दरम्यान शनिवारी सकाळी बाजार समितीच्या आवारात सकाळच्या सत्रात 412 ट्रॅक्टर चा लीलाव कमीत कमी 600 रुपये जास्तीत जास्त 2301 रुपये तर सरासरी भाव 2050 रु. होता.

हेही वाचा :

Back to top button