Prajakta Mali : 'हाच खरा candid फोटो, प्राजू तुझ्या नजर लावणाऱ्या डोळ्यांनीच घायाळ झालो' | पुढारी

Prajakta Mali : 'हाच खरा candid फोटो, प्राजू तुझ्या नजर लावणाऱ्या डोळ्यांनीच घायाळ झालो'

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‍व्हाईट डीपबॅक ब्लाऊज, त्यावर आकाशी रंगाची सुंदर साडी, गळ्यात चोकर अन्‌ केसात पांढरं गुलाबाचं फुल…व्वा क्या बात है, अशा शृंगारात प्राजक्ता माळीने (Prajakta Mali ) चारचाँद लावले आहेत. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ताने आपले नवे फोटो शेअऱ करून सर्वांनाच घायाळ केले आहे. एका तासापूर्वीच प्राजक्ताने नवे फोटो अपलोड केले अन्‌ नेटकऱ्यांच्या कॉमेंट बॉक्समध्ये उड्या पडल्या. तिच्या चाहत्यांनी या फोटोंवर खूप खूप कॉमेंट्स दिले आहेत. प्राजूचे फोटोदेखील नजर लागण्यासारखेच आहेत. (Prajakta Mali )

प्राजक्ताचे फोटो पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडेल. प्राजक्ताने कँडिड फोटो सोशल मीडियावर अपलोड करून खरा वाला #candid 🤪…Last for the road… Can’t #getover .. अशी कॅप्शन लिहिलीय. कँडीड फोटोमध्ये तिच्या तिरछी नजरेने सर्वांनाच घायाळ केलेलं आहे.

नव्या चित्रपटात झळकणार

प्राजक्ता माळी लवकरच नव्या चित्रपटात दिसणार आहे. ‘तीन अडकून सीताराम’ असे तिच्या नव्या चित्रपटाचे नाव आहे. दरम्यान तिने नव्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते.

दुनिया गेली तेल लावत अशी टॅगलाईन या पोस्टरवर देण्यात आली होती. तिने लिहिले होते-प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिलं आहे “कोणाला नाही ऐकत, कोणाला नाही जुमानत.. दुनिया गेली तेल लावत ….असं म्हणत २९ सप्टेंबरपासून धुमाकूळ घालायला येत आहेत, ‘तीन अडकून सीताराम’ !” ‘तीन अडकून सीताराम’ मध्ये प्राजक्ताबरोबर वैभव तत्तवादी मुख्य भूमिकेत आहे. २९ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

Back to top button