डेंग्यूसदृश आजाराचा त्र्यंबकला विळखा | पुढारी

डेंग्यूसदृश आजाराचा त्र्यंबकला विळखा

ञ्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा

ञ्यंबकेश्वर शहरात डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. घरोघरी थंडी, ताप, घसादुखीचे रुग्ण असून, खासगी दवाखाने फुल्ल झाले आहेत. रक्त नमुना तपासणी प्रयोगशाळांबाहेर रांगा लागत आहेत.

उपजिल्हा रुग्णालयात दररोज बाह्य रुग्ण तपासणी कक्षात 80 टक्के रुग्ण संसर्गजन्य साथीचे आहेत. ञ्यंबकेश्वर येथे नुकताच संपलेल्या अधिक महिन्यात विक्रमी संख्येने भाविकांची गर्दी झाली. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक आल्याने शहरात अस्वच्छता वाढली आहे. त्यातच अधूनमधून रिपरप पडणाऱ्या पावसाने कचरा कुजत आहे. चिखलाचे थरचे थर रस्त्यालगत साचलेले आहेत. नगरपालिका प्रशासनाला जंतुनाशकांची फवारणी, पावडर धुरळणीचा विसर पडला आहे. स्वच्छता करणाऱ्या ठेकेदार संस्थेला दर महिन्याला 15 लाख रुपये म्हणजेच दिवसाला 50 हजार रुपये मोजले जातात. मात्र स्वच्छता साफसफाई या आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

येथे दररोज धार्मिक विधीसाठी विविध ठिकाणांहून येणारे भाविक एक दोन दिवस मुक्कामी असतात. ते गावाकडे परत जाताना आजाराचा प्रसाद घेऊन जात आहेत. त्यामुळे नगरपालिकेने व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे.

Back to top button