नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा मृत्यू | पुढारी

नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा मृत्यू

नाशिक (लासलगाव) :  पुढारी वृत्तसेवा
भारतीय सैन्य दलातील जवान सागर नवनाथ पानमळे यांच्या बुलेटला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत लासलगाव पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय सैन्य दलातील जवान सागर नवनाथ पानमाळे  (30, युनिट-69, आर्मड, फिरोजपूर, पंजाब. सध्या रा. सावरगाव ता. येवला) हे त्यांच्या बुलेटने (MH15HD 4721) लासलगावहून येवल्याकडे जात असताना आंबेगाव वेळापूर शिवारात बुधवारी (दि.21) रात्री साडेनऊच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात  जवान पानमळे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांच्यासोबत असलेले दुचाकीस्वार पंकज चांगदेव पवार (30, रा. सावरगाव) यांच्या देखील डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांना तत्काळ लासलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र अस्वस्थ असल्याने त्यानंतर पुढील उपचारासाठी नासिक सिव्हिलला तातडीने त्यांना रवाना  करण्यात आले. तर अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर चालक फरार झाला आहे. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा:

Back to top button