Titanic tourist submarine : टायटॅनिक पाहायला गेलेल्या बेपत्ता पाणबुडीतील ऑक्सिजन संपला? | पुढारी

Titanic tourist submarine : टायटॅनिक पाहायला गेलेल्या बेपत्ता पाणबुडीतील ऑक्सिजन संपला?

पुढारी ऑनलाईन डेस्क : Titanic tourist submarine : अटलांटिक महासागरात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेली पाणबुडी अद्याप सापडलेली नाही. यासोबतच पाणबुडीतील ऑक्सिजनही आता पूर्णपणे संपला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत पाणबुडीमधील सर्वांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

जगातील सर्वात लोकप्रिय जहाज टायटॅनिकचे (Titanic tourist submarine) अवशेष दाखवण्यासाठी मध्य अटलांटिक महासागरात रविवारी (दि.१८) पर्यटकांना घेऊन गेलेली पाणबुडी अद्यापही बेपत्ता आहे. ही पाणबुडी कॅनडाच्या न्यूफाउंडलँड किनाऱ्याजवळ बेपत्ता झाली होती. पाच व्यक्ती सिफर्ट टायटन नावाच्या पाणबुडीतून अटलांटिक महासागरात बुडालेल्या या जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, ही पाणबुडी बेपत्ता झाली. या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी कसून प्रयत्न केला जात आहे. बचावकर्त्यांसमोर हे सर्वात मोठे आव्हान आहे.

बेपत्ता पाणबुडीतील पाच जणांमध्ये ब्रिटिश अब्जाधीश हमिश हार्डिंग, पाकिस्तानी टायकून शहजादा दाऊद आणि त्याचा मुलगा यांचा समावेश आहे. 10 हजार 432 किलो वजन असलेल्या या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी बहुराष्ट्रीय ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या ऑपरेशनअंतर्गत, यूएस कोस्ट गार्ड, कॅनडाची लष्करी विमाने, फ्रेंच जहाजे आणि टेलीगाइड रोबो इत्यादींचा शोध मोहिमेसाठी वापरल केला जात आहे.

टायटन पाणबुडीची जबाबदारी कुणाकडे?

टायटॅनिक जहाजाचे बुडालेले अवशेष दाखवण्यासाठी गेलेल्या पाणबुडीची जबाबदारी पोलर प्रिन्स नावाच्या जहाजाने घेतली आहे. पोलर प्रिन्स जहाजाने टायटन पाणबुडीला उत्तर अटलांटिक महासागरात नेले. यानंतर टायटॅनिकच्या अवशेषापर्यंत पोहोचल्यावर पाणबुडी पाण्यात उतरवली जाते. या पाणबुडीत एकावेळी फक्त चार ते पाच प्रवासी बसतात. यानंतर, पाणबुडी 4000 मीटर खोलीवर पडलेल्या टायटॅनिकच्या अवशेषासाठी रवाना झाली. पोलर प्रिन्स जहाज टायटन पाणबुडीच्या संपूर्ण प्रवासासाठी कमांड आणि कंट्रोल स्टेशन म्हणून काम करते.

Back to top button