Adipurush Row : आदिपुरुषच्या वादात क्रिती सेनॉनच्या आईची उडी, काय म्हणाल्या पाहा… | पुढारी

Adipurush Row : आदिपुरुषच्या वादात क्रिती सेनॉनच्या आईची उडी, काय म्हणाल्या पाहा...

पुढारी ऑनलाईन डेस्क : आदिपुरुष चित्रपटातील संवाद आणि दृश्यांवरून वाद सुरु असताना क्रिती सेनॉनच्या आईने या वादात उडी घेतली आहे. या चित्रपटात क्रिती सेनॉनने माता सीतेची भूमिका साकारलीय. ओम राऊत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलाय तर प्रभासने प्रभू राम यांची भूमिका साकारलीय. (Adipurush Row) काही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटावरून नाराजी आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आदिपुरुषला टीकेला सामोरेदेखील जावं लागत आहे. आता या वादाबद्दल क्रितीची आई काय म्हणते पाहा. (Adipurush Row)

अभिनेत्री क्रिती सनॉनची आई गीता सनॉन यांनी ‘आदिपुरुष’च्या वादावर मौन सोडलं. भावना समजून घ्या, असा सल्ला त्यांनी दिला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय. त्या पोस्टमध्ये म्हटंलय- “जाकी रही भावना जैसी, प्रभू मुरत देखी तिन तैसी”. ”तुमची मानसिकता आणि दृष्टीकोण चांगला असेल तर अख्खं जग तुम्हाला फक्त सुंदरच दिसेल. प्रभू श्रीराम यांनी स्वत: आपल्याला हेच शिकवलं आहे की शबरीच्या फळांमध्ये प्रेम शोधा. ते फळ उष्टे आहेत याकडे लक्ष देऊ नका. अशा प्रकारे आपण चुकांकडे दुर्लक्ष करून भावना समजून घ्या. जय श्री राम”, असे गीता यांनी म्हटले आहे.

यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एकाने म्हटले-आपल्या इतिहासाचा इतका मोठा अपमान सहन करून त्यांची बाजू घेणं कितपत योग्य आहे. आणखी एकजण म्हणतो की, खरंच बकवास आहे चित्रपट. दुसरा नेटकरी म्हणतो, भावना नावाची गोष्टचं नाही चित्रपटात.
क्रिती-प्रभास शिवाय चित्रपटात सैफ अली खान, सनी सिंह, देवदत्त नागे यांनी भूमिका साकारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Geeta Sanon (@geeta_sanon)

Back to top button