नाशिक : वर्धापन दिनानिमित्त  शिंदे गटातर्फे १९ जुलैपर्यंत “भगवा महिना” | पुढारी

नाशिक : वर्धापन दिनानिमित्त  शिंदे गटातर्फे १९ जुलैपर्यंत “भगवा महिना”

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेचा ५७ वा वर्धापनदिन आज (दि. १९) साजरा होत असून त्यानिमित्ताने शिवसेना नाशिक शहर जिल्ह्याच्या वतीने १९ जून ते १९ जुलै हा संपूर्ण महिना “भगवा महिना” म्हणून साजरा करण्यात येत आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण नाशिक शहर शहरातील मुख्य चौक भगवेमय करण्यात आले.

शहरातील ज्या ज्येष्ठ नागरिकांचा १९ जूनला वाढदिवस असेल अशा सर्व नागरिकांचा मायको सर्कल येथील शिवसेना कार्यालयात सत्कार करण्यात येणार आहे. सोबतच या सर्व ज्येष्ठांना निरामय जीवन लाभण्यासाठी संपूर्ण वर्षभर मोफत आरोग्य चिकीत्सा पुरवण्याची जबाबदारी नाशिक शिवसेनेच्या वतीने घेण्यात येणार आहे. शिवसेना क्रिडा सेलच्या माध्यमातून २५ जूनला दुपारी तीनला शुभमंगल कार्यालय, बळी मंदिर मागे, आग्रा रोड येथे नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, या जिल्ह्यातील ५२ तालुक्यांमधून १०२ क्रिडा शिक्षकांचा क्रिडारत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत योजनांची जत्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे सर्व शिलेदार आज सकाळी १० वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथून मुंबईत गोरेगाव येथील कार्यक्रमासाठी रवाना होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते व महानगरप्रमुख प्रविण तिदमे यांनी दिली.

आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात नेत्रा कदम, शुभांगी ठाकूर, अनुपमा जोशी, स्नेहल आंबेरकर, स्नेहा मोडक, तन्वी उपासनी, गायत्री भंडारी, रुपाली पवार, लता नाशिककर यांनी जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते व महानगरप्रमुख प्रविण तिदमे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी मंगला भास्कर, युवासेना विस्तारक योगेश बेलदार, उप जिल्हाप्रमुख अमोल सूर्यवंशी, विधानसभा प्रमुख रोशन शिंदे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button