US News
US News

Mass shooting in US : अमेरिकेत फादर्स डे पार्टीत गोळीबार, १ मुलगा ठार; ९ जखमी

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेमधील डाउनटाउन सेंट लुईसमध्ये रविवारी (दि.१९)  एका पार्टीत सामूहिक गोळीबार झाला. सीएनएननच्या वृत्तानूसार, यात  एक किशोरवयीन  ठार, तर नऊजण जखमी झालआहेत. स्थानिक वेळेनुसार हा मध्यरात्री १ वाजता हा गोळीबार झाला. गोळीबार प्रकरणी एका १७ वर्षीय संशियत तरुणास अटक केली आहे. (Mass shooting in US)

Mass shooting in US : १७ वर्षीय संशयित ताब्यात

माहितीनुसार,  अमेरिकेमधील डाउनटाउन सेंट लुईसमध्ये रविवारी (दि.१९) फादर्स डे निमित्त आयोजित एका पार्टीत सामुहिक गोळीबार झाला. स्थानिक वेळेनुसार हा अपघात मध्यरात्री १ वाजता झाला.  महापौर तिशौरा जोन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार यात १७ वर्षीय एक किशोरवयीन  ठार झाला असुन नऊजण ठार झाले आहेत. पोलीस प्रमुख रॉबर्ट ट्रेसी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, या गोळीबार प्रकरणी एका  एक १७ वर्षीय संशयित ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, जखमी झालेल्यांचे वय १५ ते १९ वयोगटातील असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळावरून पळत असलेल्या १७ वर्षीय महिलेलाही पायदळी तुडवण्यात आले असून तिला पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एआर-१५- रायफल आणि हँडगनसह अनेक बंदुक जप्त केल्या आहेत. कार्यालयाच्या इमारतीवर कोणाचा अधिकार होता, पक्षाची जबाबदारी कोणाची होती, याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news