नाशिक : ठाकरे गटाला आणखी झटके बसणार; ग्रामविकासमंत्र्यांचे टीकास्त्र | पुढारी

नाशिक : ठाकरे गटाला आणखी झटके बसणार; ग्रामविकासमंत्र्यांचे टीकास्त्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना ठाकरे गटातील आमदार-खासदार पक्षाला कंटाळले असून, वर्धापनदिनी आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना झटका दिला. भविष्यातही उद्धव ठाकरे यांना आणखी झटके बसणार आहेत. ठाकरे यांच्यासोबत सकाळच्या भोंग्याशिवाय कोणी ही नसेल, अशी टीका राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केली.

ना. महाजन रविवारी (दि.१८) नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा नियोजन निधी वितरणात दुजाभाव केल्याचा आरोप राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आमदारांनी केल्याबद्दल ना. महाजन यांना विचारण्यात आले. महाजन यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना आरोप करणाऱ्यांनी मागच्या काळात काय झाले हे आधी तपासावे. शिवसेनेचा मोठा गट भाजपकडे येण्यामागे उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचाही हात आहे. मविआच्या काळात पवार यांनी अर्थमंत्री म्हणून निधी वाटपात राष्ट्रवादीच्या आमदारांना झुकते माप दिले. सेना व काँग्रेस आमदारांना निधी देण्यात त्यांनी आखडता हात घेतल्याचे सांगत कोणाला किती निधी वाटप केला याचे कागद दाखवू का? असे आव्हान महाजन यांनी पवार यांना दिले. नियमानुसार निधी वाटप व कामांना मान्यता दिली गेली असेल, असे सांगत ना. भुसे यांची त्यांनी पाठराखण केली.

हेही वाचा:

Back to top button