नाशिक : यांत्रिकी झाडू खरेदीचा मार्ग मोकळा, शासनाकडून क्लीन चिट | पुढारी

नाशिक : यांत्रिकी झाडू खरेदीचा मार्ग मोकळा, शासनाकडून क्लीन चिट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

यांत्रिकी झाडू खरेदी प्रक्रियेविरुद्ध मंत्रालयात करण्यात आलेल्या तक्रारीत कोणतेही तथ्य आढले नसल्याने, शासनाने यांत्रिकी झाडू खरेदीला क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे लवकरच याबाबतची प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता असून, महापालिकेत चार यांत्रिकी झाडू दाखल होणार आहेत. शहरातील रस्ते यांत्रिकी झाडूच्या सहाय्याने चकाचक केले जातील.

शहराचे भौगोलिक क्षेत्र वाढत असून त्या तुलनेत शहर स्वच्छतेसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे महापालिकेने यांत्रिक झाडू खरेदीचा निर्णय घेतला. तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी यांत्रिकी झाडूची पाहणी व अभ्यास करण्यासाठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुजरातमधील भावनगर येथे पाठविले. महापालिकेने चार यांत्रिकी झाडू खरेदीसाठी निविदा प्रक्रियाही राबविली. पण काही जणांनी त्यास विरोध दर्शवित त्या संदर्भातदेखील राज्य शासनाकडे तक्रार केली. मागील हिवाळी अधिवेशनात याबाबत महापालिकेकडून माहिती मागविण्यात आली व ही प्रक्रिया रखडली. दरम्यान आता या तक्रारीत काहीच तक्रार नसल्याचे समोर आले. त्यामुळे यांत्रिकी झाडू खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या पैशांतून रस्ते झाडण्यासाठी यांत्रिकी झाडू खरेदी केली जाणार असून मनपाच्या तिजोरीवर कोणताही आर्थिक भार पडणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button