बसून राहण्याच्या सवयीमुळे डिमेन्शियाचा वाढतो धोका

बसून राहण्याच्या सवयीमुळे डिमेन्शियाचा वाढतो धोका
Published on
Updated on

न्यूयॉर्क : वेदांचे संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद असे चार भाग असतात. प्राचीन ऐतरेय ब्राह्मण ग्रंथात 'चरैवेति चरैवेति' (चालत राहा, चालत राहा) असा उपदेश आढळतो. त्यामध्ये म्हटले आहे की 'जो मनुष्य बसून राहतो त्याचे भाग्यही बसकण मारते, जो उठून उभा राहतो, त्याचे भाग्यही उठून उभे राहते, जो मनुष्य झोपून राहतो त्याचे भाग्यही झोपून जाते आणि जो मनुष्य चालू लागतो त्याचे भाग्यही चालू लागते. त्यामुळे तू चालत राहा, चालत राहा'… हा उपदेश शारीरिक तंदुरुस्तीसाठीही किती महत्त्वाचा आहे हे आपल्या लक्षात आले असेल. बसून राहण्याच्या सवयीने अनेक समस्या निर्माण होत असतात. आता संशोधकांनी म्हटले आहे की सतत बसून राहण्याच्या सवयीने डिमेन्शिया हा विस्मृतीशी संबंधित मेंदूचा विकार होण्याचा धोका वाढतो.

सध्या अनेकांना बैठी जीवनशैलीमुळे शारीरिक व मानसिक आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शारीरिक निष्क्रियता ही हानिकारकच असते. संशोधकांनी म्हटले आहे की आपल्यापैकी बहुतांश लोकांना दीर्घकाळ बसून काम करण्याची सवय लागलेली आहे. अशा सवयीमुळे होणार्‍या दुष्परिणामांचीही कल्पना असणे गरजेचे आहे. ही सवय शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

जे लोक दिवसातील बहुतांश वेळ बसूनच राहतात त्यांना अन्य लोकांच्या तुलनेत हृदयविकार, चेतासंस्था व हाडांशी संबंधित समस्यांचा सामना करण्याचा धोका वाढतो. अधिक वेळ बसून राहणे मेंदूसाठीही हानिकारक आहे. अशा लोकांच्या मेंदूमध्ये डिमेन्शियाच्या रुग्णांसारखीच स्थिती निर्माण होऊ लागते. यूसीएलएच्या संशोधकांनी सांगितले की नव्या आठवणी संरक्षित करण्याबाबतचा जो मेंदूचा भाग असतो त्यावर या सवयीने विपरित परिणाम दिसून येतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news