नाशिक : ‘आयसीएसई’ दहावी-बारावीचा निकाल जाहीर | पुढारी

नाशिक : ‘आयसीएसई’ दहावी-बारावीचा निकाल जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सीबीएसई बोर्डापाठोपाठ आयसीएसईच्या बोर्डाच्या इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन सर्टिफिकेट अर्थात इयत्ता दहावी आणि इंडियन स्कूल सर्टिफिकेट अर्थात इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल रविवारी (दि. 14) ऑननलाइन जाहीर झाला. दहावीचा निकाल 99.97 टक्के, तर बारावीचा निकाल 99.76 टक्के लागला. या दोन्ही परीक्षांमध्ये नाशिकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

अशोका ग्रुप ऑफ स्कूल्स अशोका मार्ग येथील अशोका ग्रुप ऑफ स्कूल्सचे विद्यार्थी बारावीच्या निकालात अनुक्रमे विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील शहर टॉपर ठरले आहेत. शाळेचा निकाल 100 टक्के लागला. विज्ञान शाखेत नवीनकुमार लक्ष्मणराज 97.5 टक्के गुणांसह प्रथम आला. आगम कसालीवाल 97.5 टक्के गुणांसह दुसर्‍या, तर स्वराज उपाध्याय 96.25 टक्के गुणांसह तिसर्‍या स्थानावर राहिला. वाणिज्य शाखेत धवन आनंद शेट्टीने 93.25 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. गर्गेश पाटील 93.25 टक्के गुणांसह दुसर्‍या, तर श्रावणी फरताडेने 92 टक्के गुणांसह तिसरा क्रमांक पटकाविला.

होरायझन अकॅडमी
मविप्र संस्था संचलित होरायझन अकॅडमीचा इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के लागला. वेदिका शुक्ल आणि आदित्य काकुस्ते 99.20 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने, तर आशिष रकिबे (98.60 टक्के) द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तसेच श्रुंगी आरोटे (98.20 टक्के) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. 131 विद्यार्थ्यांपैकी 45 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांच्या वर व 62 विद्यार्थी उत्कृष्ट श्रेणीने उत्तीर्ण झाले.

हेही वाचा:

Back to top button