नाशिक : मुलाखतीनंतर तासाभरातच ‘ती’ झाली कृषी उपसंचालक | पुढारी

नाशिक : मुलाखतीनंतर तासाभरातच 'ती' झाली कृषी उपसंचालक

नाशिक (सर्वतीर्थ टाकेद) : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक कृषी सेवा मुख्य परीक्षा 2021 च्या मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाभरातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली. यामध्ये इगतपुरी तालुक्यातील बांबळेवाडी (टाकेद) येथील श्रद्धा उत्तम भवारी राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रथम क्रमांकावर आली. श्रद्धाचे पदवीचे शिक्षण के. के. वाघ कृषी महाविद्यालय नाशिक येथे झाले असून, पदव्युत्तर शिक्षण उत्तरेतील राज्य उत्तराखंड येथील गोविंद बल्लभ पंत विद्यापीठ पंतनगर येथे झालेले आहे. श्रद्धाच्या या उत्तुंग यशाबद्दल तिचे वडील उत्तम भवारी, सुमन भवारी-बारे, माजी मुख्याध्यापक बाळासाहेब चिखले, आशा चिखले, श्रद्धाचे पती आदिवासी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष सुशीलकुमार चिखले यांच्यासह इगतपुरी व अकोले तालुक्यातील लोकप्रतिनिधी, मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

हेही वाचा:

Back to top button