धुळे : गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार | पुढारी

धुळे : गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील ईच्छापूर येथील एका अल्पवयीन मुलीला परिचीत तरूणाने पेढा खाण्यास दिला. त्यानंतर झोपी गेलेल्या तरुणीचे अपहरण करुन  तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.  या गुन्ह्यात संशयितास दोन जणांची साथ मिळाली. त्यामुळे त्यांच्यावरही पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मुलगी सायंकाळी स्वयंपाक करत असताना दादू गुलाब कारंडे (वय २२), रा.धमणार,ता.साक्री हा तिथे आला. त्याने त्या मुलीला खाण्यासाठी पेढा दिला. तो पेढा खाल्ल्यानंतर मुलीला गरगर व्हायला लागली.  त्यानंतर ती झोपी गेली. मात्र, तिचे डोळे उघडले, तेव्हा रात्रीचे चार वाजलेले होते. एका गाडीतून तिला नेले जात होते. दरम्यान तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आल्याची माहिती पीडित तरुणीने दिली. यावेळी एक जण गाडी चालवत होता. तर दुसरा मुलगाही वाहनातच होता.

यानंतर मुलीला उतरवून वाहन निघून गेले. यानंतर शेडमध्येही तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली. घटनेनंतर अत्याचार करणारा तरूण पसार झाला आहे. पोलिसांनी पीडितेच्या जबाबावरुन तिघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button