नाशिक : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त धम्मगिरीतर्फे 12 तास अभ्यास उपक्रम | पुढारी

नाशिक : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त धम्मगिरीतर्फे 12 तास अभ्यास उपक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
धम्मगिरी योगा महाविद्यालयाकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि. 14) सलग 12 तास अभ्यास उपक्रमाचे आयोजन केल्याने विद्यार्थ्यांनी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सिडको, अश्विननगर येथील धम्मगिरी अभ्यासिकेत हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच वाचनासाठी प्रेरणा मिळावी म्हणून सहभागी विद्यार्थ्यांना लेखणी व आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. उपक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष कैलास जाधव, सचिव डॉ. पल्लवी जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य यू. के. अहिरे, समन्वयक मीना गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

नाशिक : सलग 12 तास वाचन अभ्यास उपक्रमात सहभागी विद्यार्थी.

हेही वाचा:

Back to top button