CM Eknath Shinde | ‘गोरगरीबांना न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

CM Eknath Shinde | 'गोरगरीबांना न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न' - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढारी ऑनलाईन : ‘शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ या मूलमंत्राला अनुसरून आम्ही सर्वसामान्य माणसाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. गोरगरीबांना न्याय देण्यासाठी आमच्या सरकारकडून सर्व प्रयत्न केला जात असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. लाँगमार्च मध्ये मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत सुपूर्द करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी लाँगमार्च काढण्यात आला होता. यामध्ये कुंडलिक जाधव या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत मयत कुंडलिक जाधव यांच्या कुटूंबाला राज्य सरकारकडून आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जाधव या शेतकऱ्याच्या कुटुंबाला पाच लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून या मयत शेतकऱ्याला ही मदत करण्यात आली आहे.

याप्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. दरम्यान बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे. हे स्मारक जागतिक दर्जाचे करण्याचे आमचा प्रयत्न आहे. वरळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, बार्टीमध्ये २०० लोकांची फेलोशिप यादी होती. परंतु, काल (दि.१३) आम्ही ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला आहे. या फेलोशिपच्या माध्यमातून २०० कोटी रूपये देण्यात येणार आहेत. कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही बार्टीच्या माध्यमातून फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा:

 

Back to top button