नाशिककरांनो सावधान, उन्हाचा तडाखा वाढणार! | पुढारी

नाशिककरांनो सावधान, उन्हाचा तडाखा वाढणार!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहर व परिसरात शुक्रवारी (दि.७) दिवसभर ऊन आणि ढगाळ हवामानाचा खेळ सुरू होता. वातावरणातील या सततच्या बदलामुळे शहरवासीयांना घामाच्या धारा लागल्या. पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून, त्यानंतर मात्र उन्हाचा तडाखा आणखीन वाढेल, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांपलीकडे जाऊन पोहोचला होता. मात्र, दोन दिवसांपासून पाऱ्यात सातत्याने घट होत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे जिल्ह्यासह राज्यभरात निर्माण झालेल्या ढगाळ परिस्थितीमुळे पाऱ्यात घसरण झाली आहे. शहरात दिवसभर ऊन आणि ढगाळ हवामानाचा खेळ सुरू होता. त्यामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी नागरिक एसी, कूलर व पंख्यांची मदत घेत आहेत.

दुसरीकडे ग्रामीण भागातही वातावरणातील सततच्या बदलामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या २४ तासांत चांदवड तसेच अन्य ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या. पुढील दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर कमाल तापमानाच्या पाऱ्यात वाढ होईल, असा अंदाज वर्तविला जाताेय. त्यामुळे एप्रिल महिना जिल्हावासीयांसाठी हॉट ठरू शकतो.

हेही वाचा :

Back to top button