नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा
वणी-नाशिक रस्त्यावर हाॅटेल साकीसमोर सायंकाळी छोटा टेम्पो उलटल्याने टेम्पोतील 16 जण जखमी झाले. दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथील काही भाविक वणी येथे नवस फेडण्यासाठी आले होते. तो कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना हा अपघात झाला.
वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. यात बाबू जाधव, मंदाबाई गायकवाड (४३), सुमन बोंबलत (३०), यमुना धुळे (५०), दीक्षा लिलके (१४), कमल चव्हाण (५२), तनुजा गायकवाड (१८), अनिता वासले (४०), संगीता वाघमारे (१९), दीक्षा वटाणे (१२), दगू गायकवाड (६५), निकिता टोंगरे (१६), आकांक्षा चव्हाण (२०), वंदना चव्हाण (४०) हे जखमी झाले.
या सर्व जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती कळताच वणी ग्रामपंचयातीचे सदस्य विजय बर्डे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी जात जखमीस वणी ग्रामीण रुग्णालयात आणले. तसेच वणी पोलिसांनी तातडीने धाव घेत वाहतूक कोंडी दूर केली.
हेही वाचा :