नाशिक : आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीला उमेदवारी द्या… | पुढारी

नाशिक : आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीला उमेदवारी द्या...

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

चांदवड व देवळा तालुक्यात खासदार शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे संघटन इतर राजकीय पक्षांपेक्षा अतिशय मजबूत आहे. यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार येथे निवडून आला असल्याने आगामी विधानसभेची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षास सोडल्यास नक्कीच विजयश्री मिळेल. यासाठी चांदवड देवळा विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादीला देण्याची मागणी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयवत पाटील यांच्याकडे केली.

येथील जे. आर. जे. विद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात चांदवड देवळा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयवंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला आगामी विधानसभेची जागा देण्याची मागणी केली. बैठकीस माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, विजय जाधव, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, युवकचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग आदी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी तालुकाध्याक्षांचा समाचार घेतला. तालुक्यात किती क्रियाशील सभासद आहे, एकूण बूथ कमिट्या संख्या, गाव तेथे राष्ट्रवादी, एक तास राष्ट्रवादी या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती घेतली. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदवड व देवळा तालुक्यात पक्षाचे संघटन वाढवून पक्षाचे ध्येय धोरणे नागरिकांपर्यंत पोहचवा, गावा – गावात पक्ष संघटन मजबूत करा. यामुळे आगामी होणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्ष एक नंबर राहील. येणाऱ्या काळात महाविकास आघाडी सोबत जायचे की स्वतंत्र चालायचे याबाबत शरद पवार हे निर्णय घेतील. त्यामुळे आता आपण पक्ष कसा वाढीस लागेल याकडे लक्ष देण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्ष जयवंत पाटील यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांना दिल्या. बैठकीस सुनील कबाडे, मधुकर टोपे, खंडेराव आहेर, रघुनाथ आहेर, अनिल काळे, साधना पाटील, चित्रा शिंदे, कल्पना शिरसाठ, शिवाजी सोनवणे, सुखदेव जाधव, सुभाष शिंदे, डॉ. दिलीप शिंदे, प्रकाश शेळके, अरुण न्याहारकर, शहाजी भोकनळ, दत्ता वाकचौरे, अनिल पाटील, विक्रम जगताप, शैलेश ठाकरे, वसंतराव पगार, आर. डी. थोरात, नवनाथ आहेर, अल्ताफ तांबोळी, प्रांतिक सदस्य योगेश आहेर, जिल्हा सरचिटणीस जगदीश पवार,तालुका अध्यक्ष यशवंत शिरसाठ, शहर अध्यक्ष दिलीप पाटील ,नगरसेवक संतोष शिंदे, माजी सभापती उषाताई बच्छाव,नगरसेविका ऐश्वर्या आहेर आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button