माथेफिरुच्‍या तलवार हल्‍ल्‍याने लंडन हादरले, अनेक जखमी | पुढारी

माथेफिरुच्‍या तलवार हल्‍ल्‍याने लंडन हादरले, अनेक जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ईशान्य लंडनमध्ये एका माथेफिरुने तलवार हल्‍ला केल्‍याची धक्‍कादायक घटना आज (दि.३०)  सकाळी घडली. या हल्‍ल्‍यात अनेक लोक जखमी झाले आहे, असे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले आहे. हल्‍लेखोराला अटक करण्यात आली आहे; परंतु हा दहशतवादी हल्‍ला नाही, असे पोलिसांनी स्‍पष्‍ट केले आहे.

मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितले की,हल्लेखोराने हल्ला करण्यापूर्वी त्याची कार हेनॉल्ट परिसरातील  कार एका घरात घुसवली.
यानंतर 36 वर्षीय हल्‍लेखाेराने अनेक लोक आणि दोन अधिकाऱ्यांवर तलवार हल्ला केला. या हल्‍ल्‍याचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. हेनॉल्ट रेल्वे स्थानकाजवळ रस्त्यावर  एक तरुण हातात तलवार घेऊन फिरताना या व्‍हिडिओमध्‍ये दिसत आहे.  पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

ही एक भयानक घटना होती. यामुळे समुदायाला मोठा धक्का बसला आहे. तसेच नागरिकांच्‍या मनता दहशत पसरण्‍याची शक्‍यता आहे. मात्र असा कोणत्‍याही प्रकारचा धोका नाही, असे लंडन मेट्रो पोलिस उप सहाय्यक आयुक्त एडे अडेलेकन यांनी स्‍पष्‍ट केले. हा दहशतवादी हल्‍ला नाही, असे प्राथमिक तपासात स्‍पष्‍ट होत आहे. मात्र आम्‍ही सखोल तपास करत आहोत, असेही त्‍यांनी नमूद केले आहे.

ब्रिटनचे गृह सचिव जेम्स क्लेव्हरली यांनी साेशल मीडिया प्‍लॅटफाॅर्म X वर केलेल्‍या पाेस्‍टमध्‍ये म्हटलं आहे की, ‘मला हेनॉल्ट स्टेशनवर आज सकाळी घडलेल्या घटनेबद्दल नियमितपणे अपडेट केले जात आहे. मला या हल्‍ल्‍यातील जखमींबद्‍दल  सहानुभूती आहे.

हेही वाचा : 

Back to top button