नाशिक : बळजबरी घरात घूसून महिलेवर अत्याचार, तरुणाला अटक | पुढारी

नाशिक : बळजबरी घरात घूसून महिलेवर अत्याचार, तरुणाला अटक

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

घरात बळजबरीने घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. हरिदास काळू गावित ( वय ३०, रा. वाघ्याची वाडी, ता. पेठ, जि. नाशिक ) असे महिलेवर अत्याचार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित महिला ही सिडको परिसरात राहते. आरोपी हरिदास गावित हा पीडित महिलेचा दि. २५ जानेवारी ते २६ मार्च २०२३ या कालावधीत पाठलाग करीत असे. त्यानंतर तिच्या राहत्या घरात बळजबरीने घुसून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार करीत असे, तसेच नकार दिल्यास मारहाण व दमदाटी करीत असे. पीडित महिलेने संबंधास नकार दिल्याने आरोपी गावित याने पीडितेचा मोबाइल फोडून नुकसान केले.

या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनुसार अंबड पोलिस ठाण्यात हरिदास गावित याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button